February 12, 2025

Samrajya Ladha

पुणे लोकसभेचा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मताधिक्य देणार, बाणेर येते संवाद मेळाव्यात नागरिकांचा संकल्प…

बाणेर :

बाणेर येथील माऊली गार्डन मंगल कार्यालयात भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल वतीने महायुतीचे पुणे लोकसभा उमेदवार माजी महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ यांचा व कोथरूड विधानसभा मतदार संघांचे आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील यांचा नागरिकांशी संवाद हा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध सामाजिक संघटनांनी महायुतीचे लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा जाहिर केला.

 

महापौर असताना मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांसाठी केलेल्या कामामुळे नागरीक त्यांना भरभरून मतदान करतील अशा भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या. उपस्थितांनी यावेळी विक्रमी मताधिक्य देत महायुतीचे उमेदवार मोहोळ यांना निवडून आणण्याचा संकल्प सोडला. महायुतीचे सर्व राजकीय पक्ष घरोघरी जाऊन प्रचार करतील अशी ग्वाही सर्वांनी दिली.

या कार्यक्रमाला बाणेर, बालेवाडी,पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, पंचवटी, सुस, म्हाळुंगे गावातील नागरिक, विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी, विविध सोसायटीचे चेअरमन सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed