February 12, 2025

Samrajya Ladha

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आयोजित आंतरशालेय देशभक्तिपर समुहगीत स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न..

शिवाजीनगर :

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आयोजित पुज्यनीय स्व.शशिकला (आक्कासाहेब) रमाकांत एकबोटे यांच्या स्मरणार्थ आंतरशालेय देशभक्तिपर समुहगीत स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ संस्थेच्या सभागृहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारूदत्त आफळे उपस्थित होते. कै. आक्कासाहेबांचे व्यक्तिमत्व अत्यंत सुसंस्कारी व मनमिळाऊ होते. त्यांच्या चांगल्या संस्कारामुळेच आज एकबोटे कुटुंबीय सामाजिक, राजकिय व शैक्षणिक क्षेत्रात अलौकिक कामगिरी करत आहे. त्यांना वंदन करण्यासाठी एकबोटे कुटुंबियांनी हि स्पर्धा घेतली.

 

या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले,’ देशप्रेम ही आंतरिक प्रेरणा आहे ती बाहेरून निर्माण करता येत नाही. ती उपजत असते तिचा विकास करणे आवश्यक आहे. देशप्रेम जोपासा, गुणांची वृद्धी करा. जे जिंकले आहेत त्यांनी उपविजेत्या संघाचे चांगले गुण घ्या व हरलेल्या संघांनी आपण कुठे कमी पडलो याचे आत्मपरिक्षण करा. अशा स्पर्धामुळे एकमेकांना संभाळून घेण्याची वृत्ती तयार होते. अशा स्पर्धा विद्यार्थी प्रेरक आहेत.”

या नंतर बोलताना श्री मिलिंदभाऊ एकबोटे म्हणाले ही स्पर्धा आईच्या नावाने सुरु केली आहे. आईच्या उपकारातुन उतराई होता येत नाही पण त्यांनी दिलेले संस्कार हे आयुष्य सार्थकी लावतात . गितामधे चारित्र निर्माण करण्याची फार मोठी शक्ती असते तर किर्तनातुन संस्कार घडतात. श्री छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्रवीर सावरकर या सारखे महापुरूष हे याचे उदाहरण आहे.

डाॅ नंदकिशोर एकबोटे यांनी समूहगित स्पर्धेतुन देशभक्ती वृद्धिंगत व्हावी व विद्यार्थ्यांना सैन्यात भरती होऊन देशसेवा करता यावी असे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आध्यक्ष प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह प्रा शामकांत देशमुख यांनी कै आक्कासाहेब एकबोटे यांच्या आठवणींना उजाळा दिला व स्पर्धेचे स्वरूप व्यापक होत जाईल असा विश्वास व्यक्त केला.

 

कै आक्कासाहेब यांच्या स्मरणार्थ घेतलेल्या या स्पर्धेत एकुण २४ संघ सहभागी झाले. या स्पर्धेत प्रत्येक गटातुन ३ बक्षिसे देण्यात आली. ती पुढीलप्रमाणे :
प्री प्रायमरी गट
प्रथम : एन सी एल पूर्व प्राथमिक शाळा पाषाण
द्वितीय : माॅडर्न शिशुविद्यामंदीर,गणेशखिंड
तृतीय : माॅडर्न प्री प्रायमरी ईंग्लीश मिडियम स्कूल निगडी

प्राथमिक गट
प्रथम : पी ई एस माॅडर्न प्रायमरी ईंग्रजी माध्यम
शाळा, शिवाजीनगर,पुणे ५
द्वितीय : प्राथमिक विद्यामंदीर, गणेशखिंड
तृतीय : प्राथमिक विद्यामंदीर, शिवाजीनगर,पुणे ५
माध्यमिक गट
प्रथम : माॅडर्न हायस्कूल ईंग्रजी माध्यम
शाळा, शिवाजीनगर,पुणे ५
द्वितीय :माॅडर्न हायस्कूल, एन सी एल
तृतीय : माॅडर्न हायस्कूल, निगडी (मराठी मिडियम)
उत्तेजनार्थ : पी ई एस माॅडर्न गर्ल्स हायस्कूल पुणे ५
या स्पर्धेचे आयोजन पी ई एस माॅडर्न गर्ल्स हायस्कूल शिवाजीनगर पुणे ५ यांनी केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ अनुप्रिती गाजरे यांनी केले. आभार प्रदर्शन डाॅ सौ उज्ज्वला हातागळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ माया नाईक यांनी केले. या कार्यक्रमाला संस्थेतील सर्व संस्थाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. नियामक मंडळाचे सर्व सदस्य व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

You may have missed