बाणेर :
घी बँकेस मराठा उद्योजक संघाचा या वर्षातील “सर्वोत्तम स्टार्टअप ” चा पुरस्कार माजी विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसकर यांच्या हस्ते घी बँकेच्या समन्वयिका सौ ज्योती घाटे यांनी स्वीकारला !
देशातील देशी गाईंचे तूप संग्रह करण्याची चळवळ पुण्यातील बाणेर, बालेवाडी, हिंजवडी या भागातील गोप्रेमींनी सुरू करून तुपाची घी बँक ही संकल्पना पुढे आली.
पुढील पिढीच्या आरोग्यासाठी व गो संवर्धनासाठी ह्या घी बँकेची संकल्पना पुढे आली आहे. रोजच्या खाण्यासोबतच संग्रह करण्यासाठी हे सोळा देशी गाईंचे तूप उपलब्ध करून देण्यात येत आहे : ज्योती घाटे(समन्वयक घी बँक)
विक्रम मुरकुटे पाटील, संजयबापू बालवडकर, वसंतमामा साखरे, अनिल बालवडकर व श्री रवी घाटे हे या घी बँकेचे सह-संस्थापक आहेत.
देशातील सोळा देशी गाईंचे पाचशे लिटर पेक्षा जास्त तुपाचा साठा या बँकेत करण्यात आला आहे. त्याद्वारे पुढील पाच सहा वर्षानंतर ह्या जुन्या तुपाचा उपयोग कॅन्सर,स्किन डिसीज व आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे खूप चांगल्या प्रकारे होणार आहे.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..