February 12, 2025

Samrajya Ladha

बालेवाडीतील सोसायट्यांचा “ग्रीन ईनिशिएटिव ” व “ग्रीन बालेवाडी” साठी पुढाकार,आदित्य ब्रिझ पार्क सोसायटीत ७५ किलो वॅट चा सौर उर्जा प्रकल्प सुरू..

बालेवाडी :

बालेवाडीतील सोसायट्यांनी “ग्रीन ईनिशिएटिव ” व “ग्रीन बालेवाडी” साठी पुढाकार घ्यायला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून आदित्य ब्रिझ पार्क सोसायटीत ७५ किलो वॅट चा सौर उर्जा प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला. या प्रकल्पाचे उद्घाटन महाउर्जाचे अतिरिक्त महासंचालक पंकज तगलपल्लेवार यांचे हस्ते झाले.

 

या प्रकल्पाबद्दल माहिती देतांना आदित्य ब्रिझचे अध्यक्ष योगेंद्र सिंह म्हणाले की आम्ही यात केवळ आर्थिक फायदा बघितला नाही तर हे एक राष्ट्रीय कार्य समजून पर्यावरण संरक्षण साठीचे एक पाऊल आहे. सोसायटीत एसटीपी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ओला कचरा व्यवस्थापन, पाण्याचा पुनर्वापर अशा सर्व योजना राबविल्या जात आहेत.

महाउर्जाचे अतिरिक्त महासंचालक पंकज तगलपल्लेवार यांनी विविध सरकारी योजनांची माहिती देऊन त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे अवाहान केले. बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनच्या पर्यावरण संरक्षण आणि त्या अनुषंगाने जनजागरण मोहीमेची माहिती दिली गेली. पंकज तगलपल्लेवार यांनी आदित्य ब्रिझ सोसायटी आणि बालेवाडीत पर्यावरण विषयक जे मोठे काम सुरू आहे ते एक उदात्त कार्य आहे असे सांगून त्याचे कौतुक केले.

या प्रसंगी बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. आदित्य ब्रिझचे सचिव यांनी प्रास्ताविक केले तर खजिनदार मनोजकुमार यांनी सर्वांचे आभार मानले.

You may have missed