June 19, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

औंध येथील सचिन वाडेकर यांची भाजपा छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती…

औंध :

भारतीय जनता पार्टीच्या छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाच्या सरचिटणीस पदी सचिन वाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून तसे नियुक्ती पत्र त्यांना भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते देण्यात आले.

 

औंध परिसरात गेले अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीचे काम पाहिले. पक्ष बांधणी साठी करत असलेल्या कामाची पावती म्हणून माझ्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे. माझी जबाबदारी वाढली असून पक्षातील सर्वांना बरोबर घेऊन पक्ष बांधणी मजबूत करण्याचा प्रयत्न सर्वांना बरोबर घेऊन करत राहील : सचिन वाडेकर ( सरचिटणीस भाजपा छत्रपती शिवाजी नगर विधानसभा)

भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, राज्य सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, दत्तात्रय खाडे, रवींद्र साळेगावकर आदी उपस्थित होते.