उमरगा :
‘रुग्ण हक्क परिषदेने सामाजिक कार्याच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव आणि माणुसकीची शिकवण समाजात रुजवली आहे. आरोग्याच्या प्रश्नांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध घटकांना एकत्र आणण्याचे काम परिषद करीत आहे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. या वेळी डिसेंबरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या आरोग्य साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी पुणे शहराध्यक्ष व माजी महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.या वेळी ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. तसेच पहिले आरोग्य साहित्य संमेलन पुणे कार्यवृत्तांत पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये प्रा. गुणवंत जाधवर यांची संचालक म्हणून अधिकृत निवड करण्यात आली नवनिर्वाचित संचालकांना नियुक्तीपत्र व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले माजी विशेष पोलीस निरीक्षक चंद्रशेखर दैठणकर यांच्या हस्ते नवनिर्वाहीची संचालक मंडळाचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. सबनीस म्हणाले की, ‘ डॉ. भोंडवे यांच्या २४ हून अधिक ग्रंथांचे प्रकाशन झाले आहे. आरोग्यसेवा ही केवळ उपचाराची प्रक्रिया नसून समाजाच्या संवेदनशीलतेची कसोटी आहे. रुग्णाला केंद्रस्थानी ठेवून आरोग्यव्यवस्थेकडे पाहण्याची गरज असून, साहित्य आणि आरोग्य या क्षेत्रांतील संवादातून सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडू शकते.
उमेश चव्हाण म्हणाले, ‘‘रुग्णांच्या हक्कांसाठी लढताना केवळ आरोग्याचा प्रश्न हाताळत नाही, तर प्रत्येक नागरिकाला न्याय आणि सन्मान मिळावा यासाठी काम करीत आहोत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा आणि रुग्णांच्या हक्कांची जाणीव पोहोचवणे हे परिषदेचे ध्येय आहे.’’
माजी सहाय्यक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी रुग्ण हक्क परिषदेचे कार्य सामाजिक जाणीव आणि आरोग्यसेवेचा समन्वय साधणारे असल्याचे नमूद केले. अशा उपक्रमांमुळे समाजातील विविध घटकांमध्ये परस्पर विश्वास व सहकार्याची भावना बळकट होते, असे त्यांनी सांगितले.
या वेळी माजी सहाय्यक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे, डॉ. अविनाश भोंडवे, प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस, उमेश चव्हाण, माजी सहायक पशुवैद्यकीय आयुक्त डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, माजी विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, माजी सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद गायकवाड, जानमहम्मद पठाण, रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष अपर्णा मारणे-साठे, मुकेश मोहिते आदी उपस्थित होते.
फाउंडेशनचे कार्यकारी संचालक अशोक शिंदे यांनी प्रास्ताविक केले. दीपक म्हस्के यांनी आभार मानले. माजी विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सन्मान करण्यात आला.


More Stories
बालेवाडी वेलफेअर फेडरेशन आणि लायन्स क्लब तर्फे आयोजित मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद
भारतीय महिला सॉफ्टबॉल संघात बाणेरच्या वैष्णवी सायकरची निवड; तैवानमधील आशियाई युनिव्हर्सिटी स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व
*बाणेर येथील आनंदवन ज्येष्ठ नागरिक संघाला Expert Superspeciality Clinic तर्फे व्हीलचेअर प्रदान*