औंध :
भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते व पदाधिकारी सौरभ पोपट कुंडलिक यांची भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे पुणे विभागातील भाजप युवा मोर्चाच्या संघटनात्मक कामाला अधिक बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार युवा मोर्चाचे प्रदेश प्रभारी सुनील राणे आणि प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी युवा मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत पुणे विभागातून सौरभ कुंडलिक यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सौरभ कुंडलिक यांनी यापूर्वी शिवाजीनगर युवा मोर्चाचे अध्यक्ष, पुणे शहर भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष तसेच युवा मोर्चाचे प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या विविध पदांवर काम करताना त्यांनी संघटनवाढीसह पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या संघटनात्मक कार्याची आणि पक्षासाठी केलेल्या योगदानाची दखल घेत त्यांच्यावर प्रदेश पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या निवडीबद्दल भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून सौरभ कुंडलिक यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. नव्या जबाबदारीच्या माध्यमातून युवा कार्यकर्त्यांचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची विचारधारा युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे कुंडलिक यांनी सांगितले.
युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी प्रसिद्धी पत्र


More Stories
*ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या संचालक पदी ज्येष्ठ पत्रकार प्रा. गुणवंत जाधवर यांची निवड*
बालेवाडी वेलफेअर फेडरेशन आणि लायन्स क्लब तर्फे आयोजित मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद
भारतीय महिला सॉफ्टबॉल संघात बाणेरच्या वैष्णवी सायकरची निवड; तैवानमधील आशियाई युनिव्हर्सिटी स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व