October 7, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी वेलफेअर फेडरेशन आणि लायन्स क्लब तर्फे आयोजित मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद 

बालेवाडी :

बालेवाडी वेलफेअर फेडरेशन आणि लायन्स क्लब, पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नाने बाणेर-बालेवाडी येथील नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले. 

सोसायटीतील रहिवासी, जेष्ठ नागरिक, घरकाम करणाऱ्या महिला, सुरक्षा कर्मचारी, छोटे दुकानदार, बांधकाम मजूर अश्या सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ उठविला. डोळे व दृष्टी, मधुमेह, रक्ताच्या विविध चाचण्या, दंत चिकित्सा, रक्तदाब, स्तनाचा कर्करोग, बीएमआय अश्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. परिसरातील ३०० महिला आणि पुरुष यांनी या तपासण्या करून घेतल्या. या सुविधे बाबत नागरिकांनी संतोष व्यक्त केला. 

शिबिराचे उद्घाटन शिक्षणमहर्षि गणपतराव बालवडकर यांचे हस्ते झाले तर मनपा औंध वॉर्ड ऑफिस चे सहा. आयुक्त दांगट साहेब प्रमुख पाहुणे होते. लायन्स क्लबचे प्रांत प्रमुख श्रेयश दीक्षित यांनी सांगितले की अश्या सामाजिक कामात लायन्स क्लब नेहमी अग्रेसर असतो. ऑक्टोबर सेवा सप्ताह अंतर्गत विविध ठिकाणी समाज उपयोगी कामे चालू आहेत. फेडरेशनने अशी कामे सुचवावीत, लायन्स क्लब निधी कमी पडू देणार नाही. गणपतराव बालवडकर यांनी दोन्ही सामाजिक संघटनांच्या कार्याचे कौतुक केले. सहा. आयुक्त दांगट साहेब यांनी शुभेच्छा देतांना सांगितले की महानगरपालिकेतर्फे देखील मदत करण्यात येईल. फेडरेशनचे अध्यक्ष रमेश रोकडे यांनी सर्वांचे स्वागत केले तर सचिव आशिष कोटमकर यांनी पुणे महापालिका, लायन्स क्लबचे पदाधिकारी, उपस्थित डॉक्टर्स व स्टाफ व नागरिकांचे आभार मानले. 

अशोकनगर गोल्ड, शताब्दी, कोथरूड, चतुसिंगी, सहकारनगर व विजयनगर या लायन्स क्लब तर्फे उपक्रम राबविला गेला. लायन रविद्र सातपुते, सलिल कारखानीस, सुजाता कारखानीस, सतीश सांडभोर हे उपस्थित होते. लायन पराग पाटील व गोपेंद्र पाटस्कर यांनी खूप परिश्रम घेतले. बालेवाडी वेलफेअर फेडरेशनचे दफेदार सिंह, इंद्रजीत कुलकर्णी, शकील सलाती, शुभांगी चपाते, वंदना चौधरी, रूपाली रायकर, सचिन पाटील, योगेश डुंबरे, योगेंद्र सिंह, शैलेश पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शिबिर यशस्वी केले. मोरेश्वर बालवडकर आणि वैभव आढाव यांनी नियोजनासाठी विशेष कष्ट घेतले.