पौड :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पौड शाखेत शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेच्या संचालिका शिवानी बांदल मॅडम, पौड गावचे माजी सरपंच जगदीश लांडगे आणि मुख्याध्यापिका वीणा कदम मॅडम यांचे ढोल-ताशांच्या तालावर उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर संचालिका शिवानी बांदल, मुख्याध्यापिका वीणा कदम आणि उपस्थित मान्यवर माजी सरपंच जगदीश लांडगे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताने तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी झेंडागीत सादर करून देशभक्तीची भावना जागृत केली.
प्रशालेतील प्री-प्रायमरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून भारतीय एकात्मता आणि विविधतेतील एकतेचा संदेश दिला. त्यांच्या मनमोहक सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
यावेळी मुख्याध्यापिका वीणा कदम मॅडम यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देशभक्ती, देशनिष्ठा आणि राष्ट्रप्रेमाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. संस्थेच्या संचालिका शिवानी बांदल मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल सर, संचालिका रेखा बांदल मॅडम आणि शाखा प्रमुख प्राचार्या निर्मल पंडित मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापिका वीणा कदम, पर्यवेक्षिका नेत्रा काकडे, प्राजक्ता वाघवले, कोळवण शाखेच्या मयुरी दोशी, माले शाखेच्या पूजा वैद्य तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली जाधव आणि शौर्या जाधव यांनी केले. माले शाखा प्रमुख पूजा वैद्य यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.



More Stories
ममता चौकासह बाणेर-बालेवाडीतील पाच चौकांत सिग्नल यंत्रणा; चार दिवसांत कार्यान्वित होणार, नगरसेवक अमोल बालवडकरांचा पुढाकार
*पेरीविंकल च्या बावधन, सूस, पिरंगुट,पौड, कोळवण व माले या सर्व शाखांमध्ये गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी!!!*
सत्य, अहिंसा आणि देशसेवेचा संदेश; पेरिविंकल स्कूलमध्ये महात्मा गांधी- लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी