बालेवाडी :
दिनांक ९ ऑगस्ट रोजी म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियम येथे ‘५वा इंडिपेंडन्स कप – निमंत्रित तायक्वांदो स्पर्धा २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली. नवोदित खेळाडूंना स्पर्धेचा अनुभव मिळावा, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांना पुढील स्तरावर प्रगती करण्याची संधी मिळावी, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.
या स्पर्धेत *पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल पिरंगुट येथील ११* विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध खेळाचे प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनती, चिकाटी, आत्मविश्वास आणि क्रीडाभावाचे दर्शन घडवत उल्लेखनीय यश संपादन केले.
*मुलींच्या गटातील विजेते :*
ईश्वरी शेंबडे (इयत्ता ८ वी) – सुवर्णपदक 🥇
प्रांजल निकटे (इयत्ता ६ वी ) – सुवर्णपदक 🥇
अनन्या जाधव (इयत्ता ८ वी) – कांस्यपदक 🥉
*मुलांच्या गटातील विजेते :*
वेदांत रणनवरे (इयत्ता ७ वी ) – रौप्यपदक 🥈
पृथ्वीराज शिरसाठ (इयत्ता ४ थी ) – रौप्यपदक 🥈
कृष्णा भारती (इयत्ता ७ वी ) – कांस्यपदक 🥉
कौस्तुभ मोरे (इयत्ता ३ री) – कांस्यपदक 🥉
स्मित पवळे (इयत्ता ८ वी) – कांस्यपदक 🥉
आयुष कुंभार (इयत्ता ४ थी) – कांस्यपदक 🥉
कृष्णा कोरे (इयत्ता ६ वी ) – कांस्यपदक 🥉
स्वराज गुरव (इयत्ता ७ वी ) – कांस्यपदक 🥉
या विद्यार्थ्यांना चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल आणि संचालिका कु. शिवानी बांदल ,सर्व शाखा प्रमुख सौ. निर्मल पंडित यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. इनायत मुजावर व पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. पल्लवी नारखेडे, प्राथमिक विभाग प्रमुख सौ. सना इनामदार आणि माध्यमिक विभाग प्रमुख सौ. रुपाली गर्ग आणि शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
तायक्वांदो प्रशिक्षक प्रवीण मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी तयारी करून आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व ११ विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🏆👏 त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!



More Stories
*‘भक्तीचा उत्सव, पर्यावरणाची जपणूक!’ — पेरिविंकल बावधनमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या Eco-Friendly गणेशमूर्ती!!*
वसुंधरा अभियानाच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा सन्मान
*पेरिविंकलमधील सुस शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हातून साकारला ‘पर्यावरणपूरक गणराया’!* *शाडू माती गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेतून परंपरेसोबत दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश!!!*