October 3, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

देशाचा सन्मान जिथे, भाजपचा सहभाग तिथे!; तिरंगा रॅलीत कोथरूड मतदारसंघातूनही मधून हजारों नागरिकांचा सहभाग — अनिकेत चांदेरे

पुणे :

देशाचा गौरव आणि तिरंग्याचा सन्मान जिथे केला जातो, तिथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सदैव सहभागी होत आले आहेत. देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांच्या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी ११ ॲागस्ट २०२६ रोजी तिरंगा गौरव समिती, पुणे यांच्या वतीने उद्या भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या रॅलीच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी रक्त सांडलेल्या वीर जवानांना कृतज्ञतापूर्वक मानवंदना देण्यात येणार आहे. तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून तो देशाचा स्वाभिमान, शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक आहे, अशी भावना भाजप युवा मोर्चाचे कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष अनिकेत चांदेरे यांनी व्यक्त केली.

देशाचा गौरव करणाऱ्या प्रत्येक उपक्रमाला प्रोत्साहन देणे आणि त्यात सहभागी होणे ही प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाची जबाबदारी आहे. याच भावनेतून कोथरूड मतदारसंघातून उद्या हजारोंच्या संख्येने नागरिक आणि भाजप कार्यकर्ते तिरंगा हातात घेऊन रॅलीत सहभागी होणार आहेत, असे चांदेरे यांनी सांगितले.

“ज्यांनी देशासाठी रक्त सांडले, त्यांच्या बलिदानाला तिरंगा हातात घेऊन अभिवादन करणे ही आपली कृतज्ञता आहे. देशाचा गौरव जिथे केला जातो, तिथे भाजपचा कार्यकर्ता सदैव पुढे असेल,” असा निर्धार अनिकेत चांदेरे यांनी व्यक्त केला.