पुणे :
बाणेर-बालेवाडी परिसरातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या दोन महिला कार्यकर्त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. आदरणीय उमाताई गाडगीळ आणि आदरणीय अस्मिताताई करंदीकर यांची विविध शैक्षणिक संस्थांच्या नियामक मंडळांवर नियुक्ती करण्यात आली आहे.
माननीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या सकारात्मक उपक्रमांचा हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत आदरणीय उमाताई गाडगीळ यांची डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आदरणीय अस्मिताताई करंदीकर यांची एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, लोणी काळभोर येथील नियामक मंडळावर नियुक्ती झाली आहे.
बाणेर-बालेवाडी परिसरातील या दोन्ही मान्यवर महिलांच्या नियुक्तीमुळे परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या अनुभवाचा, दूरदृष्टीचा आणि कार्यक्षम नेतृत्वाचा शैक्षणिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच मोठा उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण क्षेत्रात सक्षम नेतृत्वाला संधी देण्याबरोबरच महिलांना प्रोत्साहन देण्याची भूमिका प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


More Stories
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी
*‘भक्तीचा उत्सव, पर्यावरणाची जपणूक!’ — पेरिविंकल बावधनमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या Eco-Friendly गणेशमूर्ती!!*