औंध :
महाराष्ट्राचे विकासपुरुष आणि जनतेचे आधारवड स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त औंधगाव येथे वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मा. निलेशभैय्या निकम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव श्री. अभिषेक बोके यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख विचारांना अभिवादन करत उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला. “निसर्गाचे जतन व संवर्धन हीच दादांना खरी आदरांजली” या भावनेतून वृक्षारोपण करण्यात आले असून समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक प्रकाशभाऊ ढोरे, माजी स्वीकृत नगरसेवक श्री. बाळासाहेब द. रानवडे, श्री. विनोदजी रणपिसे, सौ. पौर्णिमाताई रानवडे आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सौ. अमृता स्वप्नील रानवडे यांनी केले.
कार्यक्रमास औंधगाव विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री. राहुल प्रकाश गायकवाड, विश्वस्त श्री. विलास रानवडे, श्री. योगेश जुनवणे, श्री. महेंद्र जुनवणे, श्री. विरेंद्र जुनवणे, श्री. दीपक कलापुरे, श्री. गणेश बोडके, श्री. दिपेश गराडे, श्री. सुनील काची, पीएमटीचे माजी सभासद व ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. शहाजी रानवडे, ॲड. सतीश रानवडे, श्री. हिरामण रानवडे, श्री. विनायक रानवडे, संकेत रानवडे, विठ्ठल-रुक्मिणी महिला मंडळ, भजनी मंडळ तसेच अनेक ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


More Stories
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी
*‘भक्तीचा उत्सव, पर्यावरणाची जपणूक!’ — पेरिविंकल बावधनमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या Eco-Friendly गणेशमूर्ती!!*
वसुंधरा अभियानाच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा सन्मान