बाणेर :
योगीराज पतसंस्थेच्या वतीने दहावीच्या परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेच्या सर्व संचालक मंडळाच्या हस्ते बक्षीस देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी पियुशा म्हेत्रे बाणेर मधून पहिली सी. ए. झाल्याबद्दल, सानिका कोंडे कॉम्प्युटर सायन्स पदवी प्राप्त केल्याबद्दल व वरदान कोलते याला 13 वर्षाखालील गटात राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविल्या बद्दल विशेष गौरव करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, मुलांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यायचे हाच यामागील हेतू आहे. प्रत्येक वर्षी 90% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करायचा आणि त्यामधून 25 विद्यार्थी निवडून त्यांना दरमहा शिष्यवृत्ती द्यायची असा उपक्रम आहे. आतापर्यंत संस्थेने 225 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. तसेच शिष्यवृत्ती दिलेल्या विद्यार्थ्यांमधून 12 वी च्या परीक्षेत 97% गुण मिळविणाऱ्या श्रुती चमरे या मुलीला उच्च शिक्षणासाठी संस्थेने दत्तक घेतले व तिच्या उच्च शिक्षणाचा संपूर्ण खर्च केला. याच बरोबर संस्था विविध प्रकारे करत असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.
अशोक मुरकुटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले की, तुम्हाला ज्या क्षेत्रात रस आहे तेच क्षेत्र निवडा. आधुनिकतेचा उपयोग शिक्षणासाठी करा असेही सांगितले. मृगजळाच्या मागे धावू नका, वास्तवतेचा विचार करून निर्णय घ्या.
संस्थेचे तज्ञ संचालक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रविंद्र घाटे यांनी सांगितले की, मुलांनी पालकांनी दिलेले संस्कार आणि मूल्ये जपणे आवश्यक आहे. पुढील शिक्षण घेत असताना कष्ट आणि प्रामाणिकपणा अंगीकारल्यास यश नक्की मिळेल. जे गुण 10 वी च्या परीक्षेत मिळाले आहेत तेच सातत्य टिकविणे भविष्यात गरजेचे आहे. “दान से उडान” या लिंक वर क्लिक करा आणि विविध क्षेत्रातील तज्ञ लोकांचे करियर बाबत मार्गदर्शन घ्या असेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते, शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, संचालिका वैशाली विधाते, सहयोगी संचालिका निकिता माताडे, माजी संचालक अॅड. अशोक रानवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका सीमा डोके, पालक, व संस्थेचा सर्व स्टाफ उपस्थित होते.
आलेल्या सर्वांचे आभार संस्थेच्या संचालिका रंजना कोलते यांनी मानले.


More Stories
ट्रॅकवर खिळे, मैदानात दारूच्या बाटल्या म्हाळुंगे-बालेवाडी स्टेडियम मधे खेळाडूंच्या स्वप्नांचा चुराडा, सराव सोडून मैदान खासगी इव्हेंट साठी उपलब्ध..
बालेवाडीतील राजाभाऊ गुडदे फाउंडेशनतर्फे स्नेहवनमध्ये ‘बालदीपोत्सव ५’ उत्साहात साजरा, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील १८० मुलांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित..
*औंध-बोपोडीतील चिमुकल्यांच्या कल्पकतेला मिळाली नवी झळाळी!**मोफत आकाशकंदील कार्यशाळेतून बालसर्जनशीलतेला प्रोत्साहन**नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*