September 13, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*टाळ-मृदुंगाच्या गजरात पिरंगुट शाखेच्या पेरिविंकल स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा* 

पिरंगुट :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट येथे “भक्ती • शिस्त • सेवा • एकता” या संकल्पनेवर आधारित आषाढी एकादशी उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागत व सत्काराने तसेच सरस्वती पूजन आणि भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी पूजनाने झाली. यावेळी शाळेच्या संचालिका कु. शिवानी बांदल, दामिनी पथकाच्या सदस्या भाग्यश्री क्षीरसागर आणि पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ. धनश्री कांबळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व सांगणारी भाषणे, अभंग, गायन, लेझीम नृत्य आणि भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेला दिंडी सोहळा “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या नामघोषात मोठ्या उत्साहात पार पडला. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा जिवंत केली.

यावेळी संचालिका कु. शिवानी बांदल यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रद्धा, संस्कार आणि सांस्कृतिक जाणीव वाढीस लागते, असे सांगितले. पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ. धनश्री कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध व उत्साही सहभागाचे कौतुक केले. कु. भाग्यश्री क्षीरसागर यांनी अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व सामाजिक जाणीवा विकसित होतात, असे मत व्यक्त केले.

हा कार्यक्रम चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, 

संचालिका सौ. रेखा बांदल, संचालिका कु. शिवानी बांदल आणि सर्व शाखा प्रमुख सौ. निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. 

मुख्याध्यापिका सौ. इनायत मुजावर, पूर्वप्राथमिक विभाग सौ. पल्लवी नारखेडे, प्राथमिक विभाग प्रमुख सौ. सना इनामदार आणि माध्यमिक विभाग प्रमुख सौ. रुपाली गर्ग यांच्या नियोजनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. शेवटी “भक्ती, शिस्त, सेवा आणि एकता हीच संत परंपरेची खरी शिकवण आहे” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा भक्तिमय सोहळा संस्मरणीय ठरला.

 

You may have missed