September 13, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*पौड येथील पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पौड मध्ये आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा उत्साहातसाजरा* .

पौड :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या पौड शाखेत आज दिनांक 24 जुलै 2026 रोजी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल पौड येथे पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात श्री. विठ्ठल व रुक्मिणी मातेचे प्रतिमा पूजन व आरतीने करण्यात आली . वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान विद्यार्थी रिंगण सोहळा , पालखी सोहळा व विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात हा सोहळा पार पडला .

विठ्ठल रुक्मिणी ,संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम संत मुक्ताबाई व इतर संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळ्याचे आकर्षण ठरले .

या पालखी सोहळ्यानिमित्त पौड मधील दिगंबरनाथ मंदिर आणि पौड येथील विठ्ठल मंदिर येथपर्यंत ही शैक्षणिक दिंडी नेण्यात आली. यामध्ये मिनी केजी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .
यामध्ये विद्यार्थी वारकरी वेशभूषा करून नऊवारी साडी परिधान करून तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन विठू नामाचा गजर करत तहानभूक हरपत विठ्ठलाच्या भक्तीत दंग झाले .

याप्रसंगी चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संचालक श्री. राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ. रेखा बांदल मॅडम तसेच संचालिका शिवानी बांदल मॅडम यांनीही वारीत सहभाग घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांचे कौतुक केले.

या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या मुख्याध्यापिका वीणा कदम मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका नेत्रा काकडे, व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी केले.

 

You may have missed