औंध :
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री व लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “स्वच्छता सप्ताह” उपक्रमांतर्गत प्रभाग क्र. ०८ व प्रभाग क्र. ०९ मध्ये व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानाअंतर्गत प्रमुख रस्ते, अंतर्गत गल्ल्या, सार्वजनिक ठिकाणे व परिसरांची स्वच्छता करण्यात आली. “स्वच्छता सप्ताह” अंतर्गत प्रभाग क्र. ०८ व ०९ मधील सर्व रस्ते, प्रत्येक गल्ली व परिसर टप्प्याटप्प्याने स्वच्छ करण्यात येणार असून हा उपक्रम सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी स्वच्छ, सुंदर आणि निरोगी पुणे घडविण्यासाठी नागरिकांनीही स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती होऊन लोकसहभाग अधिक वाढेल, असा विश्वासही व्यक्त केला.
या स्वच्छता अभियानास पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर श्री. परशुरामजी वाडेकर, प्रभाग समिती अध्यक्षा सौ. रोहिणीताई चिमटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री. बाबुराव आप्पा चांदेरे, नगरसेवक श्री. सनिदादा निम्हण, नगरसेविका सौ. भक्तीताई गायकवाड, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्याध्यक्ष सौ. वैशालीताई कमाजदार, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहआयुक्त श्री. विजय नायकल तसेच औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील सर्व एस.आय., डी.एस.आय. आणि सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



More Stories
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी
*‘भक्तीचा उत्सव, पर्यावरणाची जपणूक!’ — पेरिविंकल बावधनमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या Eco-Friendly गणेशमूर्ती!!*
वसुंधरा अभियानाच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा सन्मान