बाणेर :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बाणेर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गणेश कळमकर सोशल फाउंडेशन आणि प्रल्हाद सायकर यांच्या सहकार्याने गणराज चौक येथील एबीझेड (ABZ) बिल्डिंगमध्ये आयोजित या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात तब्बल २२६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
“रक्तदान हेच श्रेष्ठदान” या भावनेतून अनेक युवक, नागरिक आणि सामाजिक भान जपणाऱ्या रक्तदात्यांनी या उपक्रमात सहभागी होत गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या पवित्र कार्यात मोलाचे योगदान दिले.
यावेळी गणेश कळमकर यांनी सर्व रक्तदाते, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. “मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न असून, रक्तदानासारख्या उपक्रमातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार आहे. रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेरणादायी असून, त्यांच्या सामाजिक जाणीवेचे मनापासून कौतुक आहे,” असे त्यांनी सांगितले.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहकारी, कार्यकर्ते आणि सहभागी नागरिकांचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले.



More Stories
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी
*‘भक्तीचा उत्सव, पर्यावरणाची जपणूक!’ — पेरिविंकल बावधनमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या Eco-Friendly गणेशमूर्ती!!*
वसुंधरा अभियानाच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा सन्मान