पाषाण :
भारतीय जनता पार्टी, उत्तर कोथरूड मंडलाच्या वतीने आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या आणि MISA (मीसा) अंतर्गत कारावास भोगलेल्या लोकशाही सेनानींचा सन्मान समारंभ मा. कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाषाण येथील कार्यालयात संपन्न झाला.
या प्रसंगी मा. श्री. प्रकाशतात्या बालवडकर, मंडल अध्यक्ष श्री. सचिनजी पाषाणकर, नगरसेविका मयुरीताई कोकाटे, नगरसेविका रोहिणीताई चिमटे, सरचिटणीस श्री. मोरेश्वरजी बालवडकर, निकिताताई माताडे, अनिकेतजी चांदेरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जेष्ठ नागरीक आघाडीचे अध्यक्ष रघुनाथ उत्पात, गिरीशजी चोक, डांगरेकाका, श्री रायचूरकर, श्री इंगळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी लोकशाही सेनानी सौ. रंजनाताई धनंजय शितोळे, श्री. विश्वनाथ व्यंकटराव देशमुख, श्री. अविनाश सिताराम मोहरिल, श्री. अभय दिवाकर देशपांडे, श्री. नमनप्पा इरप्पा हिंगमिरे, श्री. सतीश वसंत क्षिरे, श्री. रत्नाकर लक्ष्मण मानकर, श्री. रामचंद्र किसन गायकवाड आणि सौ. रोहिणी दोडके यांचा सन्मान करण्यात आला.
आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या ज्येष्ठ सेनानींचे योगदान देश कधीही विसरू शकत नाही. त्यांचा त्याग, धैर्य, राष्ट्रनिष्ठा आणि लोकशाहीप्रती असलेली अढळ बांधिलकी ही आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.





























More Stories
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*
*पिरंगुटच्या पेरिविंकलमध्ये व्यसनमुक्तीचा जागर; नागपंचमीच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा!!*