बावधन :
चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बावधन येथे शिक्षकांसाठी “AI Tools and AI Integration in Classroom Management for Teachers” या अत्याधुनिक व भविष्योन्मुख विषयावरील विशेष प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि यशस्वी वातावरणात संपन्न झाला.
या प्रशिक्षण सत्राचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रतिक राजन मुंगेकर (FRSA) उपस्थित होते. ते शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रातील प्रख्यात शास्त्रज्ञ व तज्ज्ञ असून माशेलकर स्वरूप स्पेस अँड इनोव्हेशन सेंटर, पुणे चे अध्यक्ष तसेच शारदा एज्युकेशन सोसायटी, ठाणे येथे संशोधन, नवोपक्रम व आंतरराष्ट्रीयीकरण विभागाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षण क्षेत्रातील प्रभावी व व्यावहारिक उपयोग सखोलपणे समजावून देण्यात आला.
या प्रशिक्षणामध्ये बावधन व पिरंगुट शाखेतील शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सक्रिय सहभाग नोंदविला. कृत्रिम बुद्धिमत्तेचा अध्यापन प्रक्रियेत प्रभावी वापर, धडानियोजन अधिक सुलभ करणे, वर्गव्यवस्थापन सुधारणा, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन जलद व अचूक करणे तसेच शैक्षणिक साहित्य निर्मिती अधिक सर्जनशील व परिणामकारक बनविणे यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान विविध एआय साधनांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. शिक्षकांनी या साधनांचा उपयोग दैनंदिन अध्यापनात कसा करावा याचे प्रत्यक्ष अनुभव घेतले. या सत्रामुळे शिक्षकांचे तांत्रिक कौशल्य अधिक वृद्धिंगत होऊन अध्यापन अधिक आधुनिक, प्रभावी व विद्यार्थी-केंद्रित होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
हा उपक्रम चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल, कु. शिवानी बांदल प्रमुख प्राचार्या मा. सौ. निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्याध्यापिका सौ. काकोली घोष, पर्यवेक्षिका सायली गायकवाड व शिरीन काझी यांच्या नेतृत्वाने व सहकार्याने यशस्वीरित्या व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.
शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाला चालना देणारा आणि भविष्यातील तंत्रज्ञानाधारित शिक्षणासाठी भक्कम पाया घालणारा हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी