बाणेर :
5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ,वसुंधरा बाणेर संस्थे च्या माध्यमातून, तूकाई टेकडी येथे 5 जून रोजी सकाळी दोन तासात 300 झाडे लावण्यात आली ..
गेल्या काही वर्षांमध्ये होत असलेल्या वातावरणबदलाचा परिणाम म्हणून ,असमान तापमान बदल होत असून, गेल्या महिन्याभरापासून 40 डिग्री सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागत आहे, यामध्ये निश्चितच मानवाच्या भौतिक स्वार्थामुळे, निसर्गाची जी हानी झाली आहे, ते एक फार मोठे कारण आहे.. यावर उपाय म्हणून वसुंधरा अभियान माध्यमातून फार मोठा नाही, पण एक छोटा प्रयत्न गेल्या वीस वर्षापासून वृक्षारोपणाच्या माध्यमातून वसुंधरा अभियान तर्फे चालू आहे ..
2006 पासून उजाड, ओसाड
असलेल्या टेकडीवर 55 हजार पेक्षा जास्त झाडांचे जैववैविध्य युक्त देशी जंगल तयार केलेले आहे..
प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये वृक्षारोपण करून पुढील सात वर्षे त्या झाडांची काळजी घेतली जाते.. वृक्षारोपणा चा केवळ कार्यक्रम न करता संवर्धनावर काम केले जाते….. आणि केवळ वृक्षारोपणच नाही तर जलसंवर्धन म्हणजेच, पाणी आडवा~ पाणी जिरवा वर देखील झाडांच्या माध्यमातून काम केले जाते ..
सलग समतल सर व लहान-मोठे बंधारे निर्मितीमुळे लाखो लिटर पाणी आज टेकडीवरच जिरवले जाऊन पाण्याचा जलसाठा वाढवण्यास मदत होत आहे… आजच्या या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चे महत्त्व जाणून, जवळपास 260 सदस्यांच्या उपस्थितीत यावर्षीच्या वृक्षारोपण मोहिमेस सुरुवात करण्यात आली…
पुढील तीन ते चार महिने वसुंधरा वृक्षारोपण मोहीम चालू ठेवून, वसुंधरांने नामकरण केलेल्या सह्याद्री भागामध्ये 5000 झाडांचे वृक्षारोपण उद्दिष्ट या पावसाळ्यात ठेवले आहे…
वृक्षारोपणाच्या माध्यमातून सभोवतालच्या पर्यावरण प्रेमींना वृक्षारोपण करण्यास आवाहन करण्यात आले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी