पिरंगुट :
पिरंगुट येथील चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन अर्थात मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषा व संस्कृतीच्या अभिमानाने शाळेचा परिसर भारावून गेला होता.
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. दीपप्रज्वलन व अभिवादनानंतर विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. “लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी” या ओळींनी संपूर्ण वातावरण मराठी अभिमानाने दुमदुमून गेले.
विद्यार्थ्यांनी मराठी कविता वाचन, भाषण, नाटिका आणि समूहगीत सादरीकरणातून मराठी भाषेप्रती आपले प्रेम व्यक्त केले. सादरीकरणातून मराठी भाषा ही केवळ संवादाची भाषा नसून ती संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचे प्रतीक असल्याचा संदेश देण्यात आला.
आसावरी हंचाटे मॅडमनी मराठी भाषेचे महत्त्व सांगताना विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अस्खलित वापर करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान, जिव्हाळा आणि जागरूकता निर्माण व्हावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल, शिवानी बांदल तसेच सर्व शाखा समन्वयक सौ. निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ. आसावरी हंचाटे ,माध्यमिक विभागप्रमुख सौ. पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सौ. सना इनामदार व पूर्व-प्राथमिक विभागप्रमुख सौ. पल्लवी नारखेडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यांच्या नेतृत्वाखाली सामवेद हाऊसचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.



More Stories
बावधन आणि सूस च्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये मराठी राज्यभाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा!!!
पेरीविंकल पौड शाखेत मराठी दिवस उत्साहात साजरा.
सुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सवाअंतर्गत सोमेश्वर चषक खुल्या व विविध गटातील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन,स्पर्धेत एकूण 1,00,000रकमेची पारितोषिके…