पौड :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या *पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज*, पौड शाखेमध्ये आज शुक्रवार, दिनांक *२७. फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज (वि .वा .शिरवाडकर) यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी *पेरीविंकल प्रशालेच्या संचालिका शिवानी बांदल मॅडम* आणि *मुख्याध्यापिका वीणा कदम मॅडम* उपस्थित होत्या.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्र वाटण्यात आले. प्रशालेच्या मराठी विषयाच्या शिक्षिका प्राजक्ता वाघवले व अश्विनी देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व समजावून सांगितले. शाळेच्या विद्यार्थिनींनी मराठी भाषेची महती नृत्यातून सादर केली आणि लघु नाटिकेतून मराठी साहित्य प्रकाराची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री जाधव आणि सिमरन शेख या विद्यार्थिनींनी केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर आणि संचालिका रेखा बांदल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्याकरता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी