पुणे, 26 फेब्रुवारी 2026:
युवा सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित “सुपर सनी मंथ” या क्रीडा महोत्सवाअंतर्गत सोमेश्वर चषक खुल्या व विविध गटातील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हि स्पर्धा रविवार, १ मार्च रोजी, गोविंद गार्डन मंगल कार्यालय पाषाण या ठिकाणी होणार आहे.
नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सांगितले की, “बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून तो विचारशक्ती, संयम आणि निर्णयक्षमता विकसित करणारा बौद्धिक व्यासपीठ आहे. आपल्या भागातील लहान मुलांपासून युवा खेळाडूंना स्पर्धात्मक संधी मिळावी आणि त्यांच्यातील गुणवत्ता पुढे यावी, हा ‘सुपर सनी मंथ’ मागील मुख्य उद्देश आहे. अशा उपक्रमांमुळे भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडतील, असा मला विश्वास आहे.”
स्पर्धेत एकूण 1लाख रुपयांची पारितोषिके, करंडक देण्यात येणार आहेत. पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल यांच्या मान्यतेखाली होत असलेली हि स्पर्धा 7,10,12,15 वर्षाखालील व खुल्या गटात पार पडणार आहे.
स्पर्धेला भरघोस प्रतिसाद लाभला असून आतापर्यंत विविध वयोगटात मिळून 170 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून यामध्ये 50 रेटेड खेळाडूंचा देखील समावेश आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी स्पर्धा संचालक व एमसीएचे उपाध्यक्ष राजेंद्र कोंडे (9822303540) व दिक्षा गडसिंग(7837830406) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी