पिरंगुट :
महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद पुणे आणि जनजीवन फाउंडेशन, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने पिरंगुट येथील पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थिनींसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत विद्यार्थिनींना जेंडर जागरूकता, आरोग्य, आहार, उद्योजकता तसेच कायदेविषयक माहिती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तज्ञ मार्गदर्शकांनी मुलींना आत्मविश्वास, स्वसंरक्षण, योग्य आहाराचे महत्त्व आणि आपल्या हक्कांविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध उपक्रम, प्रश्नोत्तरे आणि चर्चासत्रांमुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मभान, स्वावलंबन आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत झाली.
कार्यशाळेचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल व कु.शिवानी बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य आसावरी हंचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विभागप्रमुख पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सना इनामदार, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख पल्लवी नारखेडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली
शाळेच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षकवृंदांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे सांगितले.ही कार्यशाळा विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरली असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी दिशा देणारी ठरली आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी