पुणे :
समाजातील दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात नवी उमेद निर्माण करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि तर्क फाऊंडेशन, भारत विकास परिषद, फ्युप्रो, मिशेलिन आणि समुत्कर्ष सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० फेब्रुवारी रोजी मोफत कृत्रिम अवयव वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
नोव्हेंबर २०२५ मध्ये राबवण्यात आलेल्या तपासणी शिबिरातून निवड झालेल्या पुण्यातील लाभार्थ्यांना या सोहळ्यात प्रत्यक्ष अवयवांचे वाटप केले जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींची गतिशीलता वाढवणे आणि त्यांना आत्मसन्मानाने जगण्यास मदत करणे हा आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधाताई कुलकर्णी आणि पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ०४.३० वाजता कोथरुड मधील थरकुडे दवाखाना येथे हा अवयव प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी