शिवजयंतीचा भव्य सोहळा – पेरिविंकलच्या सूस शाखेच्या प्रांगणात!!!!
सुस :
अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सुस शाखेच्या भव्य मैदानावर अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचा प्रारंभ शिवमूर्तीपूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे इतिहासप्रेमी व इतिहास जागृत श्री. मोहन शेटे सर ,सुनील टाकळीकर – भारत को जानो उपक्रम संयोजक, श्रीधर अनगळ – संस्कार प्रमुख, शामकांत उकिडवे – संपर्क प्रमुख, दिलीप जोशी – विद्यापीठ भाग विभाग प्रमुख तसेच
शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल मॅडम, शिवानी बांदल, प्रशालेच्या प्राचार्या सौ. निर्मल पंडित मॅडम, समन्वयक सचिन खोडके, नेहा माळवदे, स्मिता श्रीवास्तव तसेच भारत विकास परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व आरती संपन्न झाली. सांस्कृतिक कार्यक्रमांत इ.११ वीची विद्यार्थिनी समृद्धी पवार हिने शिवरायांवरील प्रेरणादायी विचार मांडले. त्यानंतर सर. KG ची चिमुकली प्रणिशा जाधव हिने आपल्या बालवाणीतून पोवाडा सादर करून सर्वांची मने जिंकली.
इयत्ता ६ वी, ७ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांनी “या हो या हो शिवराया…” या समूहगीताद्वारे वातावरण दुमदुमून टाकले. तसेच इयत्ता ६ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कारातून शिवकालीन इतिहास जिवंत साकारला. शिवनेरी किल्ल्यावर झालेल्या जन्मापासून ते रायगड किल्ला येथील ६ जून १६७४ रोजी पार पडलेल्या ऐतिहासिक राज्याभिषेकापर्यंतचा संपूर्ण प्रवास विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीरीत्या व हुबेहूब सादर केला.
विशेष आकर्षण म्हणजे “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणांनी छत्रपतींचे अश्वारूढ आगमन मैदानावर झाले. खरोखरच्या घोड्यावर स्वार होऊन शिवाजी महाराजांच्या आगमनाने संपूर्ण सूस नगरी दुमदुमली. रायगडावरील ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याची हुबेहुब पुनर्रचना शाळेच्या प्रांगणात साकारण्यात आली. हा संपूर्ण शिवजन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचा संपूर्ण इतिहास विद्यार्थ्यांनी आज साकारून उपस्थितांची मने जिंकली. याचे विशेष श्रेय शिवप्रसाद पुजारी सर यांना जाते. तसेच भव्य शिवनेरी किल्ल्याचा देखावा शिवराज कदम सर व मोरे सर यांनी साकारला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र बांदल सर यांनी आपल्या मनोगतात महाराजांचा इतिहास आणि त्या मागील विचार यांची सुंदर सांगड घालत प्रतिपादन केले की, “उद्याचा विकसित भारत हा आजच्या पिढीवर अवलंबून आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ अभ्यासक्रमापुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या आचरणात आणणे आवश्यक आहे.” त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित झाली.
प्रमुख पाहुणे श्री. मोहन शेटे सर यांनीही आपल्या भाषणात सांगितले की, “जर मी ४० वर्षांपूर्वी जन्माला न येता आजच्या काळात जन्माला आलो असतो, तर पेरिविंकलमध्ये प्रवेश घेऊन या विद्यार्थ्यांसोबत या भव्य कार्यक्रमाचा भाग व्हायला मला आवडले असते.” त्यांच्या इतिहास विषयावरील सखोल अभ्यासामुळे विद्यार्थ्यांसमोर शिवचरित्र जिवंत उभे राहिले. व इतिहासातील बरेच पैलू उलगडले गेले.
प्राचार्या सौ. निर्मल पंडित मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व अचूक मार्गदर्शनाखाली इव्हेंट हेड योगिता ढाणे व सर्व शिक्षकवृंद यांच्या सहकार्याने संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे व शिक्षकांच्या परिश्रमामुळे शिवजयंती उत्सव अविस्मरणीय ठरला व ना भूतो ना भविष्यती असा सोहळा आज पेरीविंकल च्या सूस शाखेत संपन्न झाला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कृष्णा अंभूरे आणि प्रफुल्ला पाटील यांनी केले.



More Stories
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, बावधन येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
पेरीविंकल पौड शाखेत शिवजयंती उत्साहात साजरी.
उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी “सुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सव, सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन