पौड :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या *पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज*, पौड शाखेमध्ये आज बुधवार, दिनांक *१८. फेब्रुवारी २०२६ रोजी *शिवजयंती * अत्यंत जल्लोषात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात *छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ * यांच्या वेषात आलेल्या विद्यार्थ्यांच्या आगमनाने झाली. यावेळी *पेरीविंकल प्रशालेच्या संचालिका शिवानी बांदल मॅडम* आणि *मुख्याध्यापिका वीणा कदम मॅडम* उपस्थित होत्या.
मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता सातवीचा विद्यार्थी शौर्य धनवे यांनी जोशपूर्ण पोवाडा सादर केला. तसेच विद्यार्थ्यांनी शिवजन्मोत्सव ,आई तुळजाभवानीचा आशीर्वाद, आणि अफजलखानाचा वध हा देखावा नृत्यातून सादर केला. तसेच अष्टप्रधान मंडळाच्या लघुनाटिकेतून शिवाजी महाराजांच्या शिस्तबद्ध राज्यकारभाराचे सादरीकरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी शिवगर्जना व आपले शिवाजी महाराजांविषयी चे विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आराध्या जोरी व संस्कृती भिलारे या विद्यार्थिनींनी केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर आणि संचालिका रेखा बांदल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मुख्याध्यापिका वीणा कदम मॅडम पर्यवेक्षिका नेत्रा काकडे तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी वर्ग यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी