March 22, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

संघर्ष, शिक्षण आणि स्वाभिमानाचे प्रतीक – पाषाण ची कन्या आणि सुन दुहेरी भूमिकेतून गायत्री मेढे कोकाटे यांची विजयाकडे वाटचाल…

पाषाण :

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उच्च शिक्षित, संघर्षशील आणि सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या गायत्री मेढे कोकाटे यांना उमेदवारी देत स्त्रीशक्तीला ठोस बळ दिले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बाबुराव चांदेरे आणि अमोल बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चारही उमेदवारांची यशाकडे वाटचाल सुरू आहे.

गायत्री मेढे कोकाटे यांनी बी.कॉम नंतर एमबीएपर्यंतचे उच्च शिक्षण पूर्ण केले असून, त्या केवळ शिक्षणापुरत्याच नव्हे तर जीवनातील कठीण प्रसंगांना खंबीरपणे सामोऱ्या जाणाऱ्या महिलांचे जिवंत उदाहरण आहेत. पतीच्या अकाली निधनानंतरही त्या खचून न जाता स्वतःच्या पायावर उभ्या राहत कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.

पाषाणची कन्या आणि सुतारवाडी येथे वास्तव्यास असलेल्या कोकाटे कुटुंबातील सून असलेल्या गायत्री कोकाटे यांचा परिसराशी अतिशय जवळचा आणि भावनिक संबंध आहे. सामान्य घरातून आलेल्या, कोणताही राजकीय वारसा नसलेल्या या उमेदवारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संधी देत स्त्रीशक्तीला बळकटी देणारा ऐतिहासिक निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. गायत्री कोकाटे या कोकाटे घराण्याच्या सून असून, त्यांच्या रूपाने कोकाटे परिवाराला प्रथमच नगरसेवक होण्याची ऐतिहासिक संधी निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, कोणताही राजकीय वारसा नसताना, सर्वसामान्य घरातील कष्टकरी पार्श्वभूमीतून आलेल्या एका सक्षम महिलेला राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देत नव्या राजकारणाचा आदर्श समोर ठेवला आहे. हा निर्णय पक्षाच्या स्त्री सशक्तीकरणाच्या धोरणाचा ठळक प्रत्यय देणारा ठरतो आहे.

उच्च शिक्षण, जीवनातील संघर्षाचा अनुभव, समाजाशी असलेली जवळीक आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे मतदारांमध्ये गायत्री मेढे कोकाटे यांच्याबद्दल विशेष विश्वास आणि आपुलकी दिसून येत आहे. महिला, तरुण वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून, प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

संघर्षातून घडलेली, शिक्षणाने सजलेली आणि समाजासाठी काम करण्याची जिद्द असलेली गायत्री मेढे कोकाटे यांची उमेदवारी ही प्रभाग क्रमांक ९ साठी नवी आशा ठरत असून, येत्या निवडणुकीत त्या मतदारांचा विश्वास संपादन करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. उच्च शिक्षण, सामाजिक जाणीव, संघर्षातून मिळवलेले आत्मबळ आणि नागरिकांच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता यामुळे गायत्री मेढे कोकाटे या “घराघरातील आपली मुलगी” म्हणून मतदारांच्या मनात स्थान निर्माण करत आहेत.