February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

एकजूट, उत्साह आणि जनसमर्थन — मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भाजपाची दुचाकी रॅली यशस्वी

पाषाण :

पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेली भव्य दुचाकी रॅली उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या पार पडली. भाजपा उमेदवार श्री. गणेश कळमकर, श्री. लहू बालवडकर यांच्यासह इतर उमेदवारांच्या समर्थनार्थ ही रॅली काढण्यात आली होती.

या रॅलीस केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विकास, सुरक्षितता आणि सक्षम नेतृत्वाचा ठाम संदेश देत ही दुचाकी रॅली संपूर्ण प्रभागातून मार्गक्रमण करत नागरिकांपर्यंत पोहोचली.

रॅलीमध्ये हजारो भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पक्षाच्या धोरणांवर आणि नेतृत्वावर असलेला विश्वास स्पष्टपणे व्यक्त केला. ठिकठिकाणी नागरिकांकडून रॅलीचे स्वागत करण्यात आले, घोषणाबाजी आणि कमळ चिन्हाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

प्रभाग क्रमांक ०९ मधील पायाभूत सुविधा, नागरी सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी भाजपा कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला. जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची ताकद आणि मा. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या मार्गदर्शनामुळे या परिवर्तनाच्या प्रवासाला नवी दिशा मिळाल्याचे चित्र या रॅलीतून स्पष्टपणे दिसून आले.

सुस येथील भैरवनाथ मंदिर येथून सुरू झालेली ही रॅली शिवशक्ती चौक, सुतारवाडी भैरवनाथ मंदिर, तापकीर चौक, शिवनगर, साई चौक, बालाजी चौक, वाकेश्वर मंदिर, कोकाटे आळी, भैरवनाथ मंदिर, भाजी मंडई, बौध्द विहार, निम्हण माळा, लमाण तांडा, संध्या नगर, सचिन दळवी कार्यालय, ग्रीन पार्क महाबळेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कटके शाळा, दत्त मंदिर, रघुनाना चौक, मुरकुटे गार्डन, वीरभद्र नगर, सर्विस रोड, सदानंद हॉटेल, महाळुंगे मनपा शाळेजवळ, चिव्हे आळी, हनुमान मंदिर, महाळुंगे स्टेडियम, राधा चौक, गणराज चौक, बालेवाडी फाटा, लक्ष्मी माता मंदिर, दसरा चौक बालेवाडीतील पाण्याची टाकी येथे यशस्वीरीत्या समारोप झाली.