बाणेर :
पुनर्निर्माण सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित कुटुंबप्रमुख महिला संवाद कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक ९ चे अधिकृत उमेदवार गणेश कळमकर यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात महिलांच्या भावना, अपेक्षा, समस्या व संघर्ष यांविषयी मनमोकळा संवाद साधण्यात आला.
घराची धुरा सांभाळणाऱ्या कणखर महिलाच समाजाचा खरा कणा आहेत, हे या संवादातून पुन्हा अधोरेखित झाले. महिलांची सुरक्षितता, सन्मान आणि उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी श्री. कळमकर यांनी व्यक्त केला.
“महिलांचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षिततेसाठी सातत्याने काम करणे हीच माझी प्रेरणा आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या संवाद कार्यक्रमामुळे महिलांच्या प्रश्नांना प्रत्यक्ष ऐकून घेण्याची संधी मिळाल्याने उपस्थित महिलांनीही समाधान व्यक्त केले. कार्यक्रमास परिसरातील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी