बाणेर :
पुनर्निर्माण सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित कुटुंब प्रमुख महिला संवाद कार्यक्रम प्रभाग क्रमांक ९ मध्ये उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक ९ चे अधिकृत उमेदवार लहू बालवडकर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी उपस्थित माता-भगिनींशी लहू बालवडकर यांनी मनमोकळा व सकारात्मक संवाद साधत महिलांच्या दैनंदिन प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा, तसेच पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व इतर मूलभूत नागरी सुविधांवर विशेष भर देण्यात आला.
संवादादरम्यान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आजवर राबविण्यात आलेल्या विविध महिला-केंद्रित योजना व विकासात्मक उपक्रमांची माहिती देत, त्याचा महिलांच्या जीवनावर झालेला सकारात्मक परिणाम अधोरेखित करण्यात आला. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाने सातत्याने घेतलेली विकासाभिमुख भूमिका आणि भविष्यासाठी असलेला स्पष्ट दृष्टीकोन याबाबत उपस्थितांनी विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा विकासाला संधी देत भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्याचे आणि विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास प्रभागातील महिला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!