बाणेर :
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार श्री. गणेश कळमकर यांनी बाणेर येथील व्हेंटेज सोसायटीतील रहिवाशांशी थेट भेटीगाठी घेत जनसंवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधत परिसरातील विकास, मूलभूत सुविधा तसेच सुरक्षिततेविषयीच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या.
नागरिकांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत विविध मुद्दे मांडले. या सर्व प्रश्नांवर ठोस, कालबद्ध आणि प्रभावी उपाययोजना राबवण्याचा निर्धार श्री. कळमकर यांनी व्यक्त केला.
“प्रत्येक घराशी थेट संवाद आणि प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण होणारा विश्वास हीच खरी ताकद आहे,” असे सांगत त्यांनी लोकसहभागातून विकास साधण्याचा विश्वास व्यक्त केला. या भेटीगाठींमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीसाठी जनसमर्थन अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसून आले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी