छत्रपती संभाजी नगर :
फुलंब्री (जि. छत्रपती संभाजी नगर) येथील श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय येथे नुकत्याच पार पडलेल्या पारंपरिक ज्ञान आणि क्रीडा विज्ञानातील आधुनिक नवकल्पनांवरील राष्ट्रीय परिषद (NCSS 2026) मध्ये आंतरराष्ट्रीय संशोधन विकास आणि नवोन्मेष संस्था (International Institute of Research Development and Innovation) यांच्या वतीने डॉ. विद्या पठारे / हणमंते यांना “शैक्षणिक नवप्रवर्तक २०२६ (Academic Innovator 2026 Award)” प्रदान करण्यात आला.
या उल्लेखनीय सन्मानाबद्दल आज पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष मा. राजेंद्रजी घाडगे साहेब यांनी डॉ. विद्या पठारे / हणमंते यांचा विशेष सत्कार केला. शिक्षण क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधन, अध्यापनातील आधुनिक दृष्टिकोन आणि शैक्षणिक विकासासाठी केलेल्या योगदानाची दखल म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्या डॉ. संगीता जगताप तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या सन्मानामुळे शिक्षण क्षेत्रात नवोन्मेषाला चालना मिळेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या सत्काराबद्दल मा. राजेंद्रजी घाडगे साहेब, प्राचार्या डॉ. संगीता जगताप तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे डॉ. विद्या पठारे / हणमंते यांनी मनःपूर्वक आभार मानले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी