बालेवाडी :
बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन प्रत्येक निवडणुकीत पुढे येऊन सांगते की “मतदान करा. संविधानाने मतदाना चा हक्क तुम्हाला दिला आहे. पण हक्का पेक्षा कर्तव्य समजून मतदान करा. शांत बसू नका, घरा बाहेर पडा आणि मतदान करा.”
प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या कल्पना, आकर्षक घोषणा आणि चित्रं घेऊन फेडरेशन पोस्टर्स तयार करते. फेडरेशनच्या अनेक सोसायटी सदस्य असल्याने त्यांच्या प्रवेशद्वारावर हे बॅनर्स लावले जातात. सोशल मीडियावर देखील पोस्टर्स पाठवून मतदारांत जागृती निर्माण करण्याचं काम बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन सातत्याने करत आले आहे व त्याचा परिणाम म्हणून या भागातील मतदानाचा टक्का वाढत आहे.
फेडरेशन तर्फे बालेवाडीत अनेक ठिकाणी जागृती करणारी पोस्टर्स यावेळी लावण्यात आली आहेत. फेडरेशनला विश्वास वाटतो की त्यांच्या आवाहनाला येथील नागरीक सकारात्मक प्रतिसाद देतील व मोठ्या प्रमाणावर मतदान करतील.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!