पाषाण :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाषाण येथील व्हिस्परिंग विंड्स सोसायटी (फेज १ व २) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रहिवाशांशी थेट संवाद साधण्यात आला. या भेटीत नागरिकांच्या दैनंदिन समस्या, सोसायटी परिसरातील मूलभूत सुविधांची स्थिती तसेच भविष्यातील अपेक्षा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत प्रशासनाकडे योग्य तो पाठपुरावा करून शक्य तिथे तातडीने उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन उपस्थितांनी दिले. कार्यक्रमास पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित कार्याध्यक्षा सौ. वैशालीताई कमाजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती गायत्री मेढे-कोकाटे, श्री. बाबुराव चांदेरे, कु. पार्वती निम्हण तसेच अमोल बालवडकर यांच्या वतीने पाषाण परिसराचा वाढता विकास लक्षात घेऊन मूलभूत सुविधा अधिक मजबूत करणे व नागरिकांच्या दैनंदिन अडचणी कमी करणे हा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
भेटीदरम्यान नागरिकांनी संपर्कात राहणारे, काम करणारे आणि वेळेवर प्रश्न सोडवणारे प्रतिनिधित्व म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यशैलीवर विश्वास व्यक्त केला. हा विश्वास कायम राखत सर्वांशी सातत्याने संवाद ठेवून विकासाभिमुख कामकाज पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी