बालेवाडी :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील बालेवाडी परिसरात उमेदवार जीवन चाकणकर यांनी गल्लोगल्ली फिरत नागरिकांशी थेट संवाद साधला. या भेटीदरम्यान प्रचारापेक्षा अधिक आपुलकीची नाती जुळली आणि भाषणांपेक्षा अधिक माणसं भेटल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
बालेवाडीतील नागरिकांशी संवाद साधताना चाकणकर म्हणाले की, ही केवळ निवडणूक लढाई नसून आपल्या गावाच्या आणि परिसराच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेली जबाबदारी आहे. मोठी आश्वासने देणे सोपे असते, मात्र नागरिकांच्या डोळ्यात डोळे घालून प्रामाणिकपणे उभे राहणे हीच खरी कसोटी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या जनसंवादातून पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वाहतूक तसेच मूलभूत नागरी सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या अपेक्षा आणि समस्या मांडल्या. प्रत्येक प्रश्न गांभीर्याने ऐकून तो सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असा विश्वास चाकणकर यांनी दिला.
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात नागरिकांचा विश्वास आणि साथ महत्त्वाची असल्याचे सांगत, “हा प्रवास तुमच्यासाठी आणि तुमच्यासोबतच आहे,” असे आवाहन जीवन चाकणकर यांनी केले. नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकारात्मक वातावरण निर्माण केल्याचे चित्र बालेवाडी परिसरात पाहायला मिळाले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी