बाणेर :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक ९ मधील बाणेर येथील गोल्ड कॉस्ट सोसायटीत भाजपा अधिकृत उमेदवार लहू बालवडकर आणि गणेश कळमकर यांनी नागरिकांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत दैनंदिन समस्या, नागरी सुविधा, पायाभूत गरजा तसेच भविष्यातील अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. नागरिकांनी मोकळेपणाने मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याची गांभीर्याने दखल घेत, त्या समस्या वेळेत आणि प्रभावीपणे सोडवण्याचा ठाम शब्द उमेदवारांनी दिला.
🔸 उमेदवार लहू बालवडकर यांनी यावेळी सांगितले की, “नागरिकांचा विश्वास आणि प्रेम हीच आमची खरी ताकद आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नाला प्राधान्य देत मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणी, रस्ते आणि सुरक्षिततेसाठी सातत्याने काम केले जाईल. नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेने प्रयत्न करू.”
🔸गणेश कळमकर म्हणाले, “भाजपाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांचा थेट लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. संवाद, पारदर्शकता आणि विकास हीच आमची कार्यपद्धती असून प्रत्येक टप्प्यावर नागरिकांच्या सोबत ठामपणे उभे राहू.”
नागरिकांनी या भेटीदरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद देत विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. तसेच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांची माहिती नागरिकांना देण्यात आली.
प्रभागाचा विकास अधिक वेगाने साधण्यासाठी आणि नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी प्रामाणिक व सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करत, येत्या निवडणुकीत “कमळ” चिन्हासमोरील बटण दाबून भाजपच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी