बालेवाडी :
बालेवाडी येथील कम्फर्ट झोन परिसरात भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक ९ चे अधिकृत उमेदवार श्री. गणेश कळमकर यांनी नागरिकांसोबत दिलखुलास संवाद साधला. या भेटीदरम्यान स्थानिक नागरिकांनी परिसरातील विविध मूलभूत समस्या, दैनंदिन अडचणी, तसेच विकासासंबंधीच्या अपेक्षा थेट मांडल्या.
रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, सुरक्षाव्यवस्था आणि सार्वजनिक सुविधांबाबत नागरिकांनी व्यक्त केलेल्या मुद्द्यांना श्री. कळमकर यांनी गांभीर्याने ऐकून घेतले. प्रत्येक प्रश्नावर सकारात्मक चर्चा करत समस्या सोडवण्यासाठी ठोस आणि वेळबद्ध उपाययोजना राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या संवादातून नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते अधिक दृढ झाले असून, “विकासासाठी लोकांसोबत, लोकांसाठी काम” हा भाजपाचा दृष्टिकोन पुन्हा एकदा अधोरेखित झाला. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिक आणि लोकप्रतिनिधी एकत्र चालण्याचा संकल्प या भेटीतून अधिक बळकट झाला.
या संवादात्मक भेटीला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, येणाऱ्या काळात प्रभाग क्रमांक ९ च्या उज्ज्वल आणि विकासाभिमुख भविष्यासाठी ही एक महत्त्वाची पायरी ठरली आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी