बाणेर :
आगामी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. जयेश मुरकुटे यांनी बाणेर परिसरात नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचार दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रभाग क्रमांक ९ मधील विविध भागांना भेट देत मतदारांशी आपुलकीने संवाद साधला व लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत मतदान करण्याचे आवाहन केले.
या भेटीदरम्यान नागरिकांनी परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, नागरी सुविधा आदी समस्यांची मांडणी केली. यावर उमेदवार जयेश मुरकुटे यांनी प्रत्येक प्रश्न गांभीर्याने ऐकून घेत विकासाभिमुख व पारदर्शक कारभाराची ग्वाही दिली. सुशिक्षित, तरुण आणि संवेदनशील उमेदवाराला संधी देण्याचा स्पष्ट मानस यावेळी अनेक नागरिकांनी व्यक्त केला.
परिवर्तनाच्या या लढाईत सर्वसामान्य नागरिकांचा वाढता विश्वास आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे मत व्यक्त करत, “ही केवळ निवडणूक नसून प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठीची सामूहिक चळवळ आहे,” असे जयेश मुरकुटे यांनी सांगितले. जनतेकडून मिळणारा विश्वास हीच या परिवर्तनाच्या लढ्याची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी