पाषाण :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ साठी आयोजित करण्यात आलेली विजयी संकल्प सभा ज्ञानदीप मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडली. ही सभा केवळ निवडणूक प्रचारापुरती मर्यादित न राहता, प्रभागाच्या उज्ज्वल आणि सर्वांगीण विकासासाठी घेतलेला सामूहिक निर्धार ठरली.
सभेमध्ये उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह, नागरिकांच्या डोळ्यांत दिसणारी अपेक्षा आणि मनात असलेली विकासाची ओढ यामुळे संपूर्ण वातावरण सकारात्मक ऊर्जेने भारलेले होते. या सभेला मा. आमदार राहुलभैय्या मोटे, गेवराई विधानसभेचे आमदार मा. विजयसिंह पंडित, शिवनेरी–जुन्नर विधानसभेचे आमदार मा. अतुल बेनके तसेच मा. आमदार विजयराव भांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला.
या संकल्प सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, निष्ठावंत कार्यकर्ते, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या मनात प्रभाग क्रमांक ९ चा समतोल, लोकाभिमुख आणि सर्वांगीण विकास ही एकच भावना दिसून येत होती.
याच भावनेतून सभेत सर्वांनी एकत्र येत प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार बहुमताने निवडून देण्याचा ठाम विजय संकल्प केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सहउमेदवार श्रीमती. गायत्री मेढे–कोकाटे, कु. पार्वती निम्हण, श्री. अमोल बालवडकर आणि श्री. बाबुराव चांदेरे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
सभेदरम्यान उमेदवारांनी एकमताने स्पष्ट केले की, ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून जनतेने दाखवलेल्या विश्वासाची जबाबदारी प्रामाणिकपणे स्वीकारण्यासाठी आहे. प्रभाग क्रमांक ९ च्या विकासासाठी एकजुटीने, पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करण्याचा निर्धार यावेळी पुन्हा एकदा ठामपणे व्यक्त करण्यात आला.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले