बालेवाडी :
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील सुस–बाणेर–पाषाण परिसरातील नागरिकांना दिलासा देणारी मोठी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. दैनंदिन प्रवासात नागरिकांना त्रस्त करणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्गालगतचे सर्विस रस्ते तातडीने विकसित करण्याचा ठाम निर्धार पक्षाने जाहीर केला आहे.
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस व महाळुंगे या झपाट्याने वाढणाऱ्या परिसरांमध्ये निर्माण होणारी तीव्र वाहतूक कोंडी, अपघातांची भीती आणि वेळेचा अपव्यय लक्षात घेता रस्ते विकासाची कामे प्राधान्याने हाती घेतली जाणार आहेत.
उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गालगत असलेले सर्विस रोड विकसित करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल आणि ही कामे लवकरात लवकर पूर्ण केली जातील, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण व अमोल बालवडकर यांनी दिली.
सर्विस रस्ते पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून मुक्ती, सुरक्षित प्रवास, अपघातांमध्ये घट आणि वेळेची बचत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. यासोबतच वाहतूक भार कमी करण्यासाठी पर्यायी रस्त्यांचाही समांतर विकास करण्यात येणार असून, त्यामुळे नागरिकांना अधिक वेगवान व सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील सर्विस रोड विकसित करण्याबाबत पुणे महानगरपालिकेनेही स्पष्ट आश्वासन दिले असून, या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक ९ च्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
वाहतूक कोंडीमुक्त प्रभाग – हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा विकासाचा अजेंडा! 🚧🚦


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी