बाणेर :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील बाणेर या आपल्या मातृभूमीत महाविकास आघाडी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. जीवन चाकणकर यांनी गावभेट दौरा घेत नागरिकांशी थेट संवाद साधला.
या दौऱ्यात बाणेरमधील प्रत्येक वाडा, घर आणि कुटुंबाशी संवाद साधत नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेण्यात आल्या. आपल्या गावातील लोकांची भेट घेताना मन आपोआप भरून येते, ही केवळ औपचारिक भेट नसून आपल्या माणसांशी जोडलेली नात्याची आणि जबाबदारीची जाणीव असल्याचे श्री. चाकणकर यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक ९ मधील प्रत्येक घर, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचा असून मोठ्या शब्दांपेक्षा प्रामाणिकपणे काम करत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. विकास, पारदर्शकता आणि जनतेशी सतत संवाद या त्रिसूत्रीवर काम करण्याचा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला.
या गावभेटीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, स्थानिक प्रश्नांवर ठोस काम करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन श्री. चाकणकर यांनी दिले. बाणेरच्या सर्वांगीण विकासासाठी हीच आपली खरी प्रेरणा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी