बाणेर :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार गायत्री मेढे कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण आणि अमोल बालवडकर यांनी प्रचाराच्या शिगेला पोहोचलेल्या काळात एक कौतुकास्पद व जनहिताचा निर्णय घेतला आहे.
प्रचारासाठी कोणतीही बाईक रॅली किंवा वाहन रॅली न काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना होणारा त्रास टाळण्यावर उमेदवारांनी स्पष्ट भर दिला आहे. “आम्ही विकासाच्या कामावर मत मागत आहोत, लोकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण करून नाही,” अशी ठाम भूमिका उमेदवारांनी मांडली आहे.
प्रभागातील नागरिकांकडून उमेदवारांना प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नागरिकांचा विश्वास हेच आपले खरे भांडवल असल्याचे उमेदवारांनी नमूद केले. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठीच आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत, आणि कोणत्याही परिस्थितीत जनतेला त्रास होईल असे प्रकार आम्ही करणार नाही, असा विश्वासही त्यांनी दिला.
“जनहित हेच आमचे ब्रीद” या तत्वावर काम करत, विकासाभिमुख, संवेदनशील आणि जबाबदार राजकारणाचा आदर्श प्रभाग ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी घालून दिला आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी