बाणेर :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसाद दिला.
या सभेदरम्यान प्रभाग क्रमांक ०९ साठीचा जाहीरनामा (वचननामा) अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आला. या वचननाम्यामध्ये नमूद केलेली सर्व कामे ही नागरिकांची मूलभूत हक्काची असून, त्या सुविधा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा ठाम संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, वाहतूक आदी मूलभूत सुविधांसह प्रभागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास करण्याची स्पष्ट हमी भाजपकडून देण्यात आली.
हा वचननामा प्रभागातील प्रत्येक भागातील समस्या, गरजा व विकासाच्या संधींचा सखोल अभ्यास करून तयार करण्यात आला असून, नागरिकांच्या अपेक्षा व मागण्या समजून घेऊन त्याचा विकास आराखडा आखण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. नागरिकांना दिलेली ही वचने पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
यावेळी बोलताना गणेश कळमकर आणि लहू बालवडकर यांनी सांगितले की, “विकासाची गंगा प्रभागात आणायची असेल तर भारतीय जनता पार्टीला निवडून देणे अत्यावश्यक आहे. पुणे महानगरपालिकेचा महापौरही भाजपचाच असेल, त्यामुळे शहरासह प्रभागाचा विकास अधिक वेगाने साध्य होईल,” असा विश्वास नागरिकांना देण्यात आला.
या सभेस भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. गणेश कळमकर, श्री. लहू बालवडकर यांच्यासह इतर अधिकृत उमेदवार, मंडल अध्यक्ष श्री. सचिन पाषाणकर, माजी नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, ज्योतीताई कळमकर, राहुल कोकाटे, शरद भोते, नारायणजी चांदेरे, अनिकेत चांदेरे, सुहासजी भोते, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, मोरेश्वर बालवडकर, सुभाष भोळ, सचिन सुतार, महेशजी सुतार, रोहन कोकाटे, सचिन दळवी, शिवम बालवडकर यांच्यासह युवा मोर्चा व महिला मोर्चाचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने माता-भगिनी, युवक आणि नागरिक उपस्थित होते.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी