सुतारवाडी :
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील सुतारवाडी येथे श्री. आबासाहेब सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली भव्य पदयात्रा प्रचंड उत्साह, जल्लोष आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागात यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी सुतारवाडीतील नागरिकांनी केलेले जिव्हाळ्याचे स्वागत आणि घड्याळ चिन्हासोबत व्यक्त केलेला ठाम पाठिंबा हा अत्यंत प्रेरणादायी ठरला.
पदयात्रेदरम्यान नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उमेदवारांवर फुलांची उधळण करत जोरदार घोषणाबाजी केली. नागरिकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पदयात्रेला विशेष ऊर्जा देणारा ठरला.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती. गायत्री मेढे–कोकाटे, श्री. बाबुराव चांदेरे, कु पार्वती निम्हण, श्री. अमोल बालवडकर यांच्यासह प्रचार प्रमुख व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, राहुल बालवडकर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाबाबतच्या भावना जाणून घेतल्या.
यावेळी बालमतात्या सुतार, युवा नेते शिवम सुतार, संतोष तोंडे, मनोज बालवडकर, सुखदेव सुर्वे, तुकाराम सुर्वे, रणपिसे परिवार, कोकाटे परिवार, निम्हण परिवार तसेच सुतारवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेदरम्यान स्थानिक विकास, मूलभूत सुविधा, पारदर्शक प्रशासन आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आगामी निवडणुकीत विकास, पारदर्शकता आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित नागरिकांना करण्यात आले. सुतारवाडीतील जनतेचा मिळालेला भरघोस प्रतिसाद आणि विश्वास हा येणाऱ्या निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे चित्र यावेळी स्पष्टपणे दिसून आले.




More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी