बालेवाडी :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बालेवाडी येथील हास्य क्लब (SKP कॅम्पस) परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी नागरिकांशी थेट, मनमोकळा आणि सकारात्मक संवाद साधला. या भेटीदरम्यान परिसरातील विविध नागरी समस्या, मूलभूत सुविधा तसेच भविष्यात अपेक्षित असलेल्या विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. राहुलदादा बालवडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. गायत्री मेढे-कोकाटे, श्री. बाबुराव चांदेरे, सौ. पार्वती निम्हण आणि अमोल बालवडकर यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत येत्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला भरघोस पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
या भेटीदरम्यान नागरिकांनी परिसरात आतापर्यंत करण्यात आलेल्या विकासाभिमुख कामांचे कौतुक केले. नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्यासाठी नेहमीच उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
नागरिकांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि विश्वास आमच्यासाठी प्रेरणादायी असून जबाबदारी वाढवणारा आहे. या विश्वासाला पात्र ठरत बालेवाडी परिसरातील पायाभूत सुविधा, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी पुढील काळात अधिक प्रभावी, नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख कार्य करण्याचे ठाम आश्वासन यावेळी उमेदवारांकडून देण्यात आले.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!