बाणेर :
आज बाणेर परिसरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक ९ मधील सक्रिय व निष्ठावंत कार्यकर्ते श्री. जीवन चाकणकर यांची सदिच्छा भेट घेतली. ही भेट साधी असली तरी सामान्य कार्यकर्त्याच्या मनाला बळ देणारी आणि प्रेरणादायी ठरली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेला “फक्त लढ…” हा संदेश केवळ शब्दांपुरता मर्यादित न राहता, समाजकारणात कार्यरत असलेल्या सामान्य कार्यकर्त्याच्या आयुष्याला दिशा देणारा मंत्र ठरला. या शब्दांनी जीवन चाकणकर यांना नवचैतन्य, आत्मविश्वास आणि संघर्षाची नवी ऊर्जा मिळाली.
या प्रेरणादायी भेटीनंतर प्रभाग क्रमांक ९ मधील बाणेर, बालेवाडी, सुतारवाडी आणि पाषाण परिसरातील जनतेसाठी अधिक जोमाने, प्रामाणिकपणे आणि सातत्याने काम करण्याचा निर्धार आणखी पक्का झाल्याची भावना जीवन चाकणकर यांनी व्यक्त केली.
जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी संघर्ष अखंड सुरू राहील आणि “लढ…” हा संदेश कृतीत उतरवून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव आवाज उठवला जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी