बालेवाडी :
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ बालेवाडी येथील गेट वे सोसायटीमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधत सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान विकासाची स्पष्ट दिशा, विश्वासाची भक्कम नाळ आणि संवादात्मक विचारविनिमय यावर भर देण्यात आला.
यावेळी भाजपचे अधिकृत उमेदवार लहू गजानन बालवडकर, श्री. गणेश ज्ञानोबा कळमकर यांच्यासह इतर अधिकृत उमेदवार उपस्थित होते. नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत प्रभागातील आतापर्यंत झालेल्या विकासकामांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच उर्वरित प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्याची ठाम ग्वाही उमेदवारांकडून देण्यात आली.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या विकासात्मक, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख धोरणांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. आगामी निवडणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आवर्जून मतदान करावे, असे आवाहनही करण्यात आले.
“विकासासाठी तुम्ही मला साथ द्या, पुढील पाच वर्षे तुमच्या सोबत खंबीरपणे उभा राहून काम करेन,” असा विश्वास व्यक्त करत कमळ चिन्हासमोरील बटण दाबून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी नागरिकांनी भरभरून प्रेम, विश्वास आणि शुभेच्छा व्यक्त करत निवडणुकीत सक्रिय पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. नागरिकांनी दाखवलेल्या या विश्वासास पूर्ण न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि सातत्याने कार्य करण्याचा शब्द उपस्थित उमेदवारांनी दिला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी