बाणेर :
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाणेर येथील युथिका अपार्टमेंट्स येथे आयोजित करण्यात आलेल्या नागरिकांच्या मीटिंगला गणेश कळमकर उपस्थित राहिले. या वेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या विविध समस्या, अडचणी व अपेक्षा मांडल्या.
या बैठकीदरम्यान पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, वाहतूक तसेच परिसरातील नागरी सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाला गांभीर्याने ऐकून घेत गणेश कळमकर यांनी सर्व समस्या टप्प्याटप्प्याने सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
“नागरिकांच्या विश्वासावरच विकासाची पायाभरणी होते. बाणेर परिसराचा सर्वांगीण विकास हेच माझे प्राधान्य असून प्रत्येक नागरिकाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी मी सदैव उपलब्ध राहीन,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
या संवादात्मक बैठकीतून नागरिक आणि उमेदवार यांच्यात थेट संवाद साधला गेला असून येणाऱ्या काळात बाणेर परिसराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी